*कोंकण एक्सप्रेस*
*सांस्कृतील कलामंचच्या “कला कौशल्य संगीत विद्यालयाचा” झरेबांबर येथे शुभारंभ..*
*दोडामार्ग प्रतिनिधी – शुभम गवस *
कला कौशल्य व संगीत विद्यालय आगळे वेगळे असून नृत्य, गायन, वादन तसेच अभिनय आदी कला क्षेत्रातले प्रशिक्षण देणारे आणि एखाद्या संघटनेद्वारे चालविले जाणारे हे पहिले विद्यालय आहे. त्यामुळे येथील प्रशिक्षण हे दर्जेदार असणार आहे, यातून तालुक्यातील अनेक कलावंत घडतील त्यामुळे या विद्यालयाची ख्याती सर्वदूर पसरेल, असा विश्वास कला कौशल्य विद्यालयाच्या उदघाटन प्रसंगी झरेबांबर सरपंच अनिल शेटकर यांनी व्यक्त केला.
यावेळी उदघाटक गंगाराम कोळेकर, झरेबांबर सरपंच अनिल शेटकर, उद्योजक आनंद ठाकूर, आर पी आय चे नेते रमाकांत जाधव, माजी मुख्याध्यापक संतोष घोगळे, कुडासे सरपंच सौ. पूजा देसाई, मंचाचे अध्यक्ष शंकर जाधव, सचिव सागर नाईक, उपाध्यक्ष महादेव सुतार, सहसचिव विलास आईर, खजिनदार महेश पारधी, सल्लागार संजय सुतार, सदस्य देविदास सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महेश पारधी, प्रास्ताविक व आभार शंकर जाधव यांनी मानले.