*कोंकण एक्सप्रेस*
*न्यु इंग्लिश स्कूल भेडशी १९८६ दहावी व १९८८ बारावीच्या विद्यार्थी -शिक्षकांचा स्नेह मेळावा.. …*
*दोडामार्ग : शुभम गवस*
न्यु इंग्लिश स्कूल भेडशी येथील १९८५-८६ दहावी व १९८८ विद्यार्थी व शिक्षक यांचा स्नेह मेळावा न्यु इंग्लिश स्कूल भेडशी येथे साजरा करण्यात आला.
सदर स्नेह मेळाव्यात व्यासपीठावर माजी शिक्षक कार्यक्रमांचे अध्यक्ष एम.डी.मोरबाळे, ग्रामविकास कमिटी अध्यक्ष तुकाराम उर्फ भाऊ टोपले, गणेशोत्सव उत्सव मंडळ अध्यक्ष व ग्रामविकास कमिटी सदस्य नंदकिशोर टोपले, स्कुल कमिटी सदस्य प्रसाद गोलम, माजी शिक्षक बी.जी. पाटील, माजी शिक्षक अजित पांगम, माजी शिक्षक गोवेकर , माजी शिक्षिका फातर्पेकर , माजी कर्मचारी प्रकाश मडवळ, माजी कनिष्ठ लिपिक विठ्ठल घोडगेकर, माजी शिक्षिका पालेकर , माजी शिक्षिका मिनाक्षी देवुलकर, विद्यमान मुख्याध्यापक नंदकिशोर नाईक, माजी शिक्षिका बांदेकर कासकर , माजी कर्मचारी गंगाराम सामंत उपस्थित होते.
स्नेह मेळाव्यात जून्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देण्यात आला. अनेकांनी मनोगत व्यक्त केले. छञपती शिवाजी महाराजांची प्रतिमा शाळेला भेट देण्यात आली.. सुञसंचालन प्रसाद सरवणकर यांनी केले.१३६ पैकी ८६ माजी विद्यार्थी उपस्थित होते. खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात स्नेह मेळावा साजरा झाला. हास्यसम्राट अरुण गवडंळकर यांनी विद्यार्थी गणवेश परिधान करत सर्वांचेच विशेष लक्ष वेधले.