*कोंकण एक्सप्रेस*
*माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी*
*कणकवली :प्रतिनिधी*
कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी येथे वार- रविवार, दिनांक- १२ जानेवारी २०२५ रोजी, प्रशालेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कनेडी प्रशाला नेहमीच आगळ्यावेगळ्या उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. याच उपक्रमाची मेजवानी रविवारी पालकांना बघावयास मिळाली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी थोर महापुरुष, युगपुरुष यांचे कार्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरते. याच उदात्त हेतूने प्रशालेत नेहमीच थोर पुरुषांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या साजऱ्या केला जातात. रविवारी विद्यार्थ्यांसाठी ज्यादा तासिका व विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केले जाते. आजच्या रविवारी प्रशालेत इयत्ता पाचवी व आठवी वर्गाच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षा तसेच ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा केंद्र असल्याने कणकवली तालुक्यातील विविध शाळांचे विद्यार्थी या परीक्षांसाठी उपस्थित होते. विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा चालू असताना विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी एक नावीन्यपूर्ण उपक्रम प्रशालेमार्फत घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या पालकांसमवेत राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या माता पालकांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला तर पुरुष पालकांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी केली. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पालक सन्मा.गोडे सर सध्या तलाठी या पदावर कार्यरत असलेले आणि ज्यांनी पूर्वी शिक्षक पेशामध्ये आपल्या कार्य कर्तुत्वाचा ठसा उमटवलेला आहे, असे होतकरू पालक ज्यांनी “माता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे जीवन चरित्र व कार्य” उलगडून सांगितले. त्यांनी अशा प्रकारे प्रशालेत होत असलेल्या स्तुत्य उपक्रमाची चर्चा करत कार्यक्रम संपन्न केला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री.सुमंत दळवी, प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन व आभार श्री. प्रसाद मसुरकर सर यांनी केले.