*कोंकण एक्सप्रेस*
*माजी विद्यार्थी व शाळेतील मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांना योग्य असे व्यासपीठ मिळावे:नागेश मोरये*
*कासार्डे प्रतिनिधी ; संजय भोसले*
माजी विद्यार्थी मेळावा व स्नेहसंमेलन कार्यक्रम माजी विद्यार्थी व शाळेतील मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांना योग्य असे व्यासपीठ मिळावे म्हणून आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमुळे माजी विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त ओढ आपल्या शाळेकडे लागेल आणि पुन्हा त्यांना शाळेचे दिवस अनुभवता येईल हा त्यामागचा हेतू होता असे प्रतिपादन नांदगाव पंचक्रोशी माध्यमिक शिक्षण संस्था चेअरमन नागेश मोरये यांनी केले ते सरस्वती हायस्कूल नांदगावच्या माजी विद्यार्थी स्नेह मेळावा व स्नेहसंमेलन कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी चेअरमन नागेश मोरये यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करुन या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली त्यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, तिवरे सरपंच भाई आंबेलकर,ओटव सरपंच रूहिता तांबे, खजिनदार सुभाष बिडये,अँड दिपक अंधारी, पंढरी वायंगणकर, सुनील आंबेरकर, श्रीधर मोरये,व्यापारी संघटना अध्यक्ष पप्पी सापळे, पोलीस पाटील वृषाली मोरजकर, सावित्री पाताडे, पाटील विजय मोरये, समिर मयेकर, मंगेश तांबे, विजय सावंत ,मुख्याध्यापक सुधीर तांबे, पालक संघाचे मारुती मोरये यांच्यासह माजी विद्यार्थी व मान्यवरा उपस्थित होते.
यावेळी झालेल्या रांगोळी स्पर्धेत वर्षा दिलीप बापर्डेकर,आफरोजा यासीन नावळेकर, पूर्वा प्रसाद फोंडके तर होम मिनिस्टर स्पर्धेत नीलिमा निलेश मोरजकर,पूर्वा पंकज पाटील,तनुजा आप्पाजी वॉस्टर व पाककला स्पर्धेत किर्ती कैलास वाळवे,अस्मिता शामसुंदर मोरये,वैदही किरण बोभाटे आणि वेशभूषा स्पर्धेत वैदही किरण बोभाटे, समीक्षा अभिजीत पारकर,आफरोजा यासीन नावळेकर यानी क्रमांक पटकावले सर्व विजेत्यांचे मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात माजी विद्यार्थी व शोलेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संजय सावंत सर यांनी मानले आहे.