*कोंकण एक्सप्रेस*
*सोनावल श्री सातेरी देवीचा वार्षिक जत्रोत्सव १२जानेवारीला…*
*दोडामार्ग ः शुभम गवस*
नवसाला पावणारी आणि माहेरवाशिणीची पाठीराखी अशी ख्याती असणाऱी सोनावल श्री सातेरी देवी वार्षिक जत्रोत्सव रविवार दिनांक १२ जानेवारी साजरा होत आहे .
देवस्थानच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची मानाची ओटी भरण्यात येणार आहे. रात्री १२ वाजता आजगावकर दशावतार नाट्य मंडळ,आजगांव यांचे दणदणीत पौराणिक दशावतारी नाटक होणार आहे. तरी सर्व भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सोनावल ग्रामस्थांनी केले आहे.