फोंडाघाट महाविद्यालयास नॅक तज्ज्ञ समिती बेंगलोर यांची भेट.

फोंडाघाट महाविद्यालयास नॅक तज्ज्ञ समिती बेंगलोर यांची भेट.

*कोंकण एक्सप्रेस*

*फोंडाघाट महाविद्यालयास नॅक तज्ज्ञ समिती बेंगलोर यांची भेट.*

*फोंडाघाट ः प्रतिनिधी*

नुकतीच कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट मध्ये तपासणी आणि अधिस्वीकृती करण्यासाठी नॅक बेंगलोर तज्ज्ञ समितीने भेट दिली. देशभरात उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि नॅकच्या विविध निकषानुसार महाविद्यालयाचे कामकाज होते का? याचे मूल्यमापन करण्यासाठी ही भेट दिली होती. यामध्ये हिमाचल प्रदेश विद्यापीठ शिमालाचे माजी कुलगुरु डॉ. सुनील गुप्ता, बनारस हिंदू विद्यापीठ वाराणशी येथील इंग्रजी विषयाचे प्रोफेसर डॉ. कृष्णा पांडे आणि शुशुर्ती मॅनेजमेंट संस्था बेंगलोर येथील संचालक डॉ. कृष्णा मिश्रा यांनी संस्था संचालक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री. महेश सावंत यांनी डॉ. सुनील गुप्ता, संस्थेचे सेक्रेटरी श्री. चंद्रशेखर लिंग्रस यांनी डॉ. कृष्णा पांडे यांचे तर प्राचार्य पुरंधर नारे यांनी डॉ. कृष्णा मिश्रा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले…

दोन दिवस महाविद्यालयाची संपूर्ण पाहणी केल्यानंतर एक्झिट मीटिंगमध्ये नॅक तज्ज्ञ टीमचे प्रमुख डॉ. सुनील गुप्ता यांनी महाविद्यालयाच्या प्रगतिशील वाटचालीचा उल्लेख करत महाविद्यालयाच्या भावी वाटचालीस सदिच्छा दिल्या. तसेच तपासणीचा अहवाल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांच्याकडे सुपूर्त केला.

ही भेट यशस्वी होण्यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी व संचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य, नॅकचे समन्वयक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनींनी, पालक, माजी विद्यार्थी या सर्वांनी अतिशय परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!