*साटेली-भेडशी आरोग्य केंद्रातील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद*
जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान नाणिजधाम व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, शाखा दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली-भेडशी येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.भाजपा जिल्हा उपाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. यावेळी दोडामार्ग भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर दळवी,जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानचे दोडामार्ग प्रमुख सुभाष गवस, रमिला बागकर, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे दोडामार्ग उपाध्यक्ष सौ.गीतांजली संतोष सातार्डेकर, प्रसिद्धी प्रमुख भूषण सावंत आदी उपस्थित होते.
