*कोंकण एक्स्प्रेस*
*वेंगुर्लेतील पत्रकारिता समाजास हितकारक : प्रसन्ना उर्फ बाळू देसाई*
*वेंगुर्ले : प्रतिनिधी*
दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. त्यांनी केलेले कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे.त्याचप्रमाणे वेंगुर्ले तालुक्यातील सर्वच पत्रकार आज पत्रकारितेबरोबरच समाजहिताचे व्रत जोपासत असून हे भूषणावह आहे ,असे प्रतिपादन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी वेंगुर्ले येथे बोलताना केले. वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाच्या वतीने आज 6 जानेवारी रोजी वेंगुर्ले येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
यावेळी मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष योगेश तांडेल ,माजी जिल्हा उपाध्यक्ष दाजी नाईक,माजी जिल्हा कार्यकारिणी सदस्य दिपेश परब, प्रदीप सावंत,भरत सातोसकर ,एस.एस.धुरी ,अजय गडेकर,बिट्टू गावडे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रदिप सावंत यांनी व दाजी नाईक यांनी आभार मानले.