*कोंकण एक्सप्रेस*
*लांजा येथील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत केला शिवसेना पक्षप्रवेश*
*रत्नागिरी : प्रतिनिधी*
यामध्ये RDC चे संचालक मुन्ना खामकर, काँग्रेस माजी शहराध्यक्ष प्रसन्न शेट्ये, उबठाचे महीला शहर संघटीका छायाताई गांगण, वि. का. स. सोसायटीचे उपाध्यक्ष विकास चव्हाण, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष शरीफ नाईक, पंकज लांजेकर, बावा राणे, आरवाग उपसरपंच स्वानंद कदम यांच्या सह अनेकमान्यवरांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे गिफ्ट असल्याचे प्रवेश करणाऱ्यानी सांगितले.
यावेळी विधानसभाचे प्रमुख राजू कुरूप, तालुका प्रमुख गुरूप्रसाद देसाई, मनोहर बाईत, शहर प्रमुख सचिन डोंगरकर आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते.