*कोंकण एक्स्प्रेस*
*सदस्य नोंदणीत मालवण तालुका अग्रेसर रहावा – नाम.नितेश राणे यांचे आवाहन*
*मालवण : प्रतिनिधी*
भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता महा अभियान २०२५ अंतर्गत मालवण शहर भाजपा कार्यालय येथे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी रविवारी सायंकाळी भेट दिली. यावेळी सदस्यता महाअभियान मोहिमेचा आढावा घेतला. सर्वांनी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करून पक्ष संघटना अधिक सक्षम करावी, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.मालवण तालुका हा राणे साहेबांचा हक्काचा बालेकिल्ला आहे.तो सदस्य नोंदणीत अग्रेसर राहावा असेही आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जेष्ठ पदाधिकारी विलास हडकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहरअध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अभियान प्रमुख राजु परुळेकर, माजी सभापती अजिंक्य पाताडे, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर यांसह अन्य पदाधिकारी महिला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.