*कोंकण एक्सप्रेस*
*कुडाळ एमआयडीसीत अनैतिक प्रकार घडू नये म्हणून कार्यरत राहणार पोलिसांचे विशेष पथक: पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल*
*कुडाळ : प्रतिनिधी*
कुडाळ येथे असलेल्या एमआयडीसी परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचे अनैतिक प्रकार घडू नये यासाठी विशेष पोलीस पथक कार्यरत करणार असल्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी एमआयडीसी असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या संवाद कार्यक्रमांमध्ये सांगितले तसेच या ठिकाणचे उद्योग सुरक्षित आणि निर्भयपणे करण्यासाठी उद्योजकांना जे सहकार्य लागेल ते सहकार्य पोलीस विभाग करेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सध्या पोलीस वर्धापन दिन साजरा केला जात आहे आणि याचे औचित्य साधून पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी कुडाळ एमआयडीसी येथील उद्योजकांशी संवाद साधला एमआयडीसी असोसिएशनच्या कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर,उपाध्यक्ष पावसकर,पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम,सचिव नकुल पार्सेकर तसेच असोसिएशनचे पदाधिकारी व उद्योजक उपस्थित होते.
या संवाद कार्यक्रमांमध्ये अनेक उद्योजकांनी एमआयडीसी येथे होणाऱ्या घटना सांगितल्या. बऱ्याच ठिकाणी रात्रौच्या वेळेला पार्त्या केल्या जातात तसेच अनेक विविध प्रकार या एमआयडीसीमध्ये घडत असतात. कधी कधी उद्योजकांना सुद्धा त्याचा त्रास होतो. त्यांना दादागिरी केली जाते. हे कुठेतरी थांबावं अशी मागणी त्यांनी केली. त्यावेळी पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी सांगितले की, यासाठी विशेष पथक नेमून एमआयडीसीमध्ये गस्त घातली जाईल आणि जे कोणी अशा प्रकारे अनैतिक प्रकार आणि पार्ष्या करत असतील त्यां ताब्यात घेतले जाईल हे आमच्याकडून जरी सहकार्य होत असले
प्रकारे अनैतिक प्रकार आणि पार्ष्या करत असतील त्यांना ताब्यात घेतले जाईल हे आमच्याकडून जरी सहकार्य होत असले तरी उद्योजकांनी सुद्धा या ठिकाणी काम करणारे कामगार कोण आहेत ते कुठून आले त्यांची परिपूर्ण माहिती पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक आहे. ज्या कंपन्यांमध्ये वीस पेक्षा जादा कर्मचारी आहेत त्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षितेसाठी समिती नेमणे गरजेचे आहे. बंद असलेल्या कंपन्यांमध्ये काय होतं याकडे सुद्धा लक्ष उद्योजकांनी ठेवणे गरजेचे आहे या ठिकाणी असणाऱ्या उद्योजकांना सुरक्षित आणि निर्भयपणे उद्योग करता यावेत यासाठी आम्ही पूर्णपणे पाठीशी उभे राहू तुमच्याही सहकार्याची गरज असून एखाद्या उद्योजकाकडे खंडणी मागण्याचे प्रकार जरी झाले तरी ते आम्हाला सांगावेत आम्ही कारवाई करू जेवढी आमची जबाबदारी आहे तेवढे तुमचेही कर्तव्य आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.