अनधिकृत वाळू उत्खननाबाबत जिल्हाधिकाऱ्यांची कडक भूमिका

अनधिकृत वाळू उत्खननाबाबत जिल्हाधिकाऱ्यांची कडक भूमिका

*कोंकण एक्सप्रेस*

*अनधिकृत वाळू उत्खननाबाबत जिल्हाधिकाऱ्यांची कडक भूमिका*

*सोनवडे येथे अनधिकृत वाळू असलेल्या दोन होड्या पाण्यात बुडवल्या*

*कुडाळ :प्रतिनिधी*

कुडाळ तालुक्यामध्ये होत असलेल्या अनधिकृत वाळू उत्खनन या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी कडक भूमिका घेतली असून स्वतः घटनास्थळी जाऊन कारवाई करायला सुरुवात केली आहे.सोनवडे येथे नदी पात्रात असलेल्या वाळू उत्खनन करणाऱ्या २ होड्यांवर कारवाई करून या होड्या पाण्यात बुडवण्यात आल्या आहेत.

कुडाळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत वाळू उत्खनन केले जात आहे आणि वाळू वाहतूक सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडला जात आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी धडक मोहीम हाती घेतली आहे.कुडाळ तालुक्यातील सोनवडे येथे केल्या जाणाऱ्या वाळू उत्खननांवर कारवाई केली या ठिकाणी असलेल्या वाळू भरलेल्या होड्या ताब्यात घेतल्या आणि त्या पाण्यात बुडविल्या.या कारवाईवेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, तहसीलदार वीरसिंह वसावे, निवासी नायब तहसीलदार प्रतीक आढाव, मंडल अधिकारी, तलाठी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!