*कोंकण एक्सप्रेस*
*दापोलीत गॅस सिलेंडरच्या स्फोटात पती-पत्नी गंभीर जखमी*
*दापोली : प्रतिनिधी*
दापोली शहरातील रूपनगर येथे गॅस सिलेंडरचा स्फोट होऊ पती-पत्नी गंभीर भाजले.घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.ही घटना शुक्रवारी घडली.याबाबत दापोली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,अविनाश श्रीकांत शिर्के हे दापोली शहरातील एचपी गॅस वितरण कंपनीत नोकरीला आहेत.काही वर्षांपासून घरोघरी सिलेंडर पोहोचविण्याचे काम ते करतात.
शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास ते घरी आले होते.यादरम्यान त्यांच्या पत्नी अश्विनी अविनाश शिर्क यांनी गॅस लिक झाल्याचे अविनाश यांना सांगितले.त्यावेळी गॅस लिक झाल्याचा वास कुठून येतो,याची त्यांनी पाहणी केली.परंतु,याच वेळेस घरात लाईट टीव्ही चालू होती.काही कळायच्या आतच घरात मोठा स्फोट झाला.त्यामध्ये पती-पत्नी भाजले.
समाजसेविका संपदा पारकर व काहींनी त्यांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे उपचारासाठी दाखल केले.यावेळी तपासाअंती त्यांना ऐकू येणे बंद झाल्याने डॉक्टर मोमीन यांनी सांगितले. दरम्यान, घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घराची एक भिंत कोसळली आहे.तर घरातील सोफा,टीव्ही व अन्य काही वस्तू जळाल्या आहेत.त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.अविनाश शिर्के यांची दोन्ही मुले शाळेत गेल्याने मोठा अनर्थ टळला.
या स्फोटामध्ये अविनाश शिर्के व आश्विनी शिर्के हे गंभीरित्या जखमी झाले असून त्यांना प्रथम दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र पुढील उपचारासाठी त्यांना तातडीने मुंबई येथे हलवण्यात आले आहे.