*कोंकण एक्सप्रेस*
*डॉ. शरयू आसोलकर यांना शिक्षक भारती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर*
*कासार्डे प्रतिनिधी :संजय भोसले*
बालिका दिनाचे औचित्य साधून शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने दिला जाणारा”क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार 2025″ डॉ. शरयू आसोलकर यांना जाहीर करण्यात आला.डॉ.शरयू आसोलकर या संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
काफला 1987 या गझल संग्रहात गझल समाविष्ट , पुढच्या हाका या कविता संग्रहात डॉ.आसोलकर यांची कविता समाविष्ट आहे. तसेच अनवट वाटा 2009 या मुंबई विद्यापीठातील प्रथम वर्ष कला अनिवार्य साठी नेमलेल्या कवितासंग्रहामध्ये कविता समाविष्ट करण्यात आली आहे.
याचबरोबर विविध नियतकालिकांमधून समीक्षा लेखन पुस्तक परीक्षण ललित लेखन व कविता प्रसिद्ध झाले आहेत तुटले पण पुन्हा बांधून घेताना हा त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आहे. अशाप्रकारे मराठी साहित्य क्षेत्रामध्ये डॉ. शरयू आसोलकर यांनी योगदान दिले आहे.शिक्षक भारतीच्या महिला आघाडी प्रमुख सुस्मिता चव्हाण यांनी डॉ. शरयू आसोलकर यांना सन 2025 चा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा केली.
डॉक्टर शरयू आसोलकर यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर शिक्षक भारतीचे संस्थापक विधान परिषद माजी आमदार आदरणीय कपिल पाटील सर, शिक्षक भारती महाराष्ट्र अध्यक्ष अशोक बेलसरे, शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य प्रमुख कार्यवाह श्री संजय वेतुरेकर, शिक्षक भारती सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रशांत आडेलकर,राज्य प्रतिनिधी चंद्रकांत चव्हाण तसेच ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण बांदेकर सर यांनी अभिनंदन केले.
नुसकताच सावंतवाडी येथे डॉक्टर शरयू आसोलकर यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमाला शिक्षक भारती महाराष्ट्र राज्याचे प्रमुख कार्यवाह संजय वेतूरेकर, ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण बांदेकर, शिक्षक भारती सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रशांत आडेलकर, जिल्हा सचिव समीर परब राज्य प्रतिनिधी चंद्रकांत चव्हाण, महिला आघाडी प्रमुख सुस्मिता चव्हाण, महिला आघाडी सचिव प्रगती आडेलकर, शिक्षक भारती कार्याध्यक्ष प्रदीप सावंत जिल्हा संघटक आकाश पारकर विद्या शिरसाट प्रणिता बांबुळकर शारदा गावडे ,तसेच जिल्ह्यातील शिक्षक भारतीचे जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.