*कोंकण एक्सप्रेस*
*श्रीमंत पुर्णानंद भवनाच्या वर्धापनदिनानिमित्त कणकवली तालुकास्तरीय निबंध स्पर्धा*
*कणकवली : प्रतिनिधी*
कुडाळ देशकर आद्य गौड ब्राम्हण समाज,कणकवली यांच्या वतीने श्रीमंत पुर्णानंद भवनाच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने कणकवली तालुका ज्ञाती बांधव मर्यादित निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे.ही स्पर्धा शालेय आणि खुल्या अशा दोन गटात होणार आहे.
वय वर्ष 21 पर्यंत शालेय गटासाठी विषय पुढीलप्रमाणे आहेत. पहिला विषय – 10 वी.- 12 वी.साठी खाजगी शिकवणी आवश्यकच आहे का?, दुसरा विषय – व्यक्तिमत्व विकासात पालकांची भुमिका काय असावी, तिसरा विषय – शारिरीक आणि मानसिक तंदुरूस्तीसाठी मैदानी खेळ कसे आवश्यक ठरतात, प्लॅस्टिक मुक्त जग,माझे विचार आणि उपाय.वय वर्ष 21 पुढील खुल्या गटासाठी विषय पुढीलप्रमाणे आहेत – पहिला विषय – समाज माध्यमे ज्ञान आणि माहितीसाठी कितपत उपयोगी, संस्कृती संवर्धनात धर्म आणि जात यांची भुमिका, जुन्या धार्मिक आणि सामाजिक परंपरा निरामय जीवनासाठी कशा पुरक होत्या, कृत्रिम बुध्दिमत्ता शाप कि वरदान. शालेय गटासाठी शब्द मर्यादा 300 शब्दांची तर खुल्या गटासाठी 500 शब्दांची आहे.
स्पर्धकांनी निबंध बंद लिफाफ्यात त्यावर नाव,पत्ता आणि मोबाईल नंबरसह 16 जानेवारी रोजी संध्या.7 वाजेपर्यंत राजू आजगावकर- 9421266464, प्रथमेश महाजन – 7499606293, मंदार अवसरे – 9326603197, प्रथमेश सामंत – 8348727272, सुयोग टिकले – 9420206538 यांच्याकडे द्यावेत असे आवाहन करण्यात आले आहे.