*कोंकण एक्सप्रेस*
*सीए परीक्षेत सुयश मिळवल्याबद्दल तन्वी कदम हिचा ओसरगाव वासियांनी केला गौरव*
*कणकवली : प्रतिनिधी*
ओसरगावचे सुपुत्र संतोष कदम (मळीवाडी सध्या रा. ओरोस) यांची कन्या तन्वी ही देशातील अत्यंत प्रतिष्ठेची तथा कठीण समजली जाणारी सनदी लेखापाल परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास होऊन तिने उत्तुंग यश मिळविले.तिच्या यशाने ओसरगावचा देखील नावलौकिक वाढला.
त्यामुळे सर्व स्तरातून तन्वीचे अभिनंदन होत आहे.शासकीय स्तरावरील अधिकारी वर्गाने तन्वीला गौरविले आहे.ओसरगाव ग्रामस्थांनी देखील ओसरगावच्या कन्येचा तिच्या ओरोस येथील घरी भेट देऊन गौरव केला आणि तिला सन्मानित करुन सुयश चिंतिले.