*कोकण Express*
*पटकीदेवी क्रीडा मित्रमंडळ कणकवली यांच्या वतीने व्दिवीजा वृध्दाश्रमाला मदत…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली येथील पटकीदेवी कला क्रीडांमंडळ कणकवली यांच्यावतीने व्दिवीजा वृध्दाश्रम असलदे येथे अन्नधान्य व रोख स्वरुपात मदत करण्यात आली आहे. क्रिकेट स्पर्धेतून शिल्लक राहिलेल्या रक्कमेचा सदुपयोग सामाजिक बांधिलकीचे भान राखत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वृध्दाश्रमाला अन्नधान्य व रोख ५ हजार रुपयांची मदत वृध्दाश्रमाच्या अध्यक्षा दिपिका रांबाडे यांच्याकडे सुपुर्द केली.
यावेळी व्दिवीजा वृध्दाश्रमाचे सचिव संदेश शेटये, पटकीदेवी मित्रमंडळाचे राजा कडूलकर, रवी माणगांवकर, पंकज पेडणेकर, अजय पारकर, गणेश हुमरसकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.