*कोंकण एक्सप्रेस*
*अखेर कुडाळ नगराध्यक्ष अक्षता खटावकर यांनी दिला राजीनामा*
*कुडाळ : प्रतिनिधी*
कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष अक्षता खटावकर यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याजवळ दिला आहे. लवकरच अध्यक्ष पदाची निवड लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत अध्यक्षपदाचा पदभार उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांच्याकडे देण्याची शक्यता आहे.
कुडाळ नगरपंचायतीमध्ये महाविकास आघाडीची सत्ता असून पहिल्या सव्वा वर्षांमध्ये काँग्रेसच्या नगरसेविका आफरिन करोल यांना नगराध्यक्ष पद देण्यात आले होते.पुढच्या सव्वा वर्षांमध्ये काँग्रेसच्या नगरसेविका अक्षता खटावकर यांना नगराध्यक्ष पद देण्यात आले त्यांच्या कालावधीला दीड वर्षे पूर्ण झाला.त्यांनी राजीनामा द्यावा म्हणून महाविकास आघाडी करून सातत्याने प्रयत्न केले गेले. दरम्यान उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांच्या विरोधात भाजपा नगरसेवक रामचंद्र उर्फ निलेश परब यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल केला होता त्यामुळे राजीनामा नाट्य थांबले होते. आता पुन्हा राजीनामा देण्यासाठी वारंवार विचारणा होत असल्यामुळे अखेर अक्षता खटावकर यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला.
पुढील काळासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नगरसेवकांमधून नगराध्यक्ष असणार आहे. तर उपनगराध्यक्ष काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. दरम्यान हा राजीनामा देण्यासाठी महाविकास आघाडी मधील माजी नगराध्यक्ष आफरीन करोल, माजी उपनगराध्यक्ष व गटनेता मंदार शिरसाट, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, उदय मांजरेकर, श्रेया गवंडे, ज्योती जळवी, श्रुती वर्दम, सई काळप, स्वीकृत नगरसेवक संतोष शिरसाट उपस्थित होते.