*कोंकण एक्सप्रेस*
*संगमेश्वर निढलेवाडी येथे होंडासिटी गाडीचा अपघात*
*संगमेश्वर :प्रतिनिधी*
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गांवर संगमेश्वर निढलेवाडी येथे चारचाकी गाडी चालवणाऱ्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात चालकासह इतर पाच प्रवाशी जखमी झाले असून यात तीन मुलांचा समावेश आहे.
अपघातामध्ये गाडी थेट मुख्य रस्ता सोडून कित्येक अंतर रस्त्या बाहेर जाऊन पुन्हा मुख्य रस्त्यावर आली. इतका गाडीला वेग होता. शौकत बाबा मुल्लाजी (मूळ गाव संगमेश्वर चिखली, सध्या रा. रत्नागिरी) हे त्यांच्या ताब्यातील होंडा सिटी गाडी (नंबर ०५ Aग /५९८४) ही गाडी घेऊन चिखली येथून रत्नागिरी येथे जात होते. या गाडीत त्यांच्या बरोबर आफ्रिन मुबीन खाल्फे (वय ३३), हिजान मुबीन खाल्फे (वय १०वर्ष), अलमीरा मुबीन खाल्फे वय १४ वर्ष हे सर्व राहणार रत्नागिरी (धनजीनाका), फिजा नजीब खांचे वय वर्ष २९, आफ्राज खांचे वय वर्ष ६ सर्व राहणार रत्नागिरी (शिवाजी नगर) हे प्रवास करत होते. या अपघातात चालकासह गाडीतील दोन महिला आणि तीन मुलांना मार लागला असून जखमी झाले आहेत. सर्व जखमीवर संगमेश्वर येथील खासगी दवाखान्यात उपचार करून अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील दवाखान्यात नेण्यात आले. हा अपघात बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडला.
अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव, मनवळ, जोशी, बरगाळे आधी पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.