*कोंकण एक्सप्रेस*
*खा.नारायण राणे कुटुंबियांचे दातृत्व घाडी कुटुंबाने अनुभवले*
*मालवण : प्रतिनिधी*
संवेदनशील राणे कुटुंबाचे दातृत्व पुन्हा एकदा जनतेने अनुभवले आहे. काही महिन्यांपूर्वी आचरा देवगड मार्गावर झालेल्या भीषण अपघातात रुद्र धोंडू घाडी (वय १०) या मुलाने उजवा पाय गमावला. याबाबत माहिती महाराष्ट्र माजी केंद्रीय खासदार नारायण राणे यांना मिळाली. राणे साहेबांच्या माध्यमातून आरोग्यसेवेचे काम पाहणारे कार्यकर्ते झाहिद भाई खान व फातिमा पनवाला यांच्या आरोग्यसेवेच्या माध्यमातून रुद्र याला नवीन कृत्रिम पाय बसवत त्याला पुन्हा दोन्ही पायावर उभे करण्यात आले आहे.
दरम्यान, रूद्र घाडी व त्यांच्या आई-वडिलांनी मुंबई येथे खा. नारायण राणे व सौ. निलमताई राणे यांची भेट घेत आभार व्यक्त केले. यावेळी राणे साहेबांनी त्यांची आपुलकीने विचारपूस केली. तसेच सोबत असल्याचे सांगितले. राणे कुटुंबियांच्या आपुलकीने घाडी कुटुंब भारावून गेले.
खासदार राणे साहेब, सौं. नीलमताई राणे खऱ्या अर्थाने जनतेचे पालक म्हणून काम करतात. जनतेबद्दल आपुलकी त्यांच्यात नेहमी दिसून येते. अशीच आपलकी व दातृत्व आमदार निलेश राणे, कॅबिनेट मंत्री नितेश राणे नेहमीच जनतेबद्दल जपतात. जनतेत राहून काम करणारे हे कुटुंब जनतेचे खऱ्या अर्थाने पालक आहेत. अशीच भावना व्यक्त केली जात आहे.