*जिह्याच्या पर्यटनाला चालना देणारा लायन्सचा महोत्सव, आमदार निलेश राणे.*

*जिह्याच्या पर्यटनाला चालना देणारा लायन्सचा महोत्सव, आमदार निलेश राणे.*

*कोंकण एक्सप्रेस*

*जिह्याच्या पर्यटनाला चालना देणारा लायन्सचा महोत्सव, आमदार निलेश राणे.*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

कुडाळ येथील लायन्स चा महोत्सव हा पर्यटनाला चालना देणारा लायन्स महोत्सव आहे. सिंधुदुर्गच्या विकासासाठी महत्त्वाचे योगदान ठरत आहे. आंतरराष्ट्रीय लायन्स या सेवाभावी संस्थेचे सामाजिक कार्य सर्वांसाठी भुषणावह आहे, असे प्रतिपादन कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथील लायन्स महोत्सवच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना सांगितले.

सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागत पार्श्वभूमीवर लायन्स क्लब ऑफ कुडाळ, सिंधुदुर्ग या सेवाभावी संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या 23 व्या लायन्स फूड फेस्टिवलला कालपासून कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर दिमाखात सुरुवात झाली. महोत्सवाचे, उद्घाटन कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघांचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल प्रथम उप प्रांतपाल लायन, विरेंद्र चिखले लायन सीए, सुनील सौदागर उपाध्यक्ष कोकण रिजन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अॅड ऐंग्रीकल्चर श्रीकृष्ण परब उपाध्यक्ष वेस्टर्न रिजन महाराष्ट्र रमाकांत मालू लक्ष्मी ज्वेलर्सचें राहुल पाटणकर, राजू पाटणकर अँड अजित भणगे अँड श्रीनिवास नाईक लायन सेवा संकुल अध्यक्ष ऍड अमोल सामंत लायन्स क्लब कुडाळ प्रेसिडेंट चंद्रशेखर पुनाळेकर लायन फेस्टिवल चेअरमन गणेश म्हाडदळकर आनंद बांदिवडेकर सीए सागर तेली, ऍड समीर कुळकर्णी मंदार शिरसाट लायन्स, रोटरी क्लबचे पदाधिकारी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर रसिकवर्ग उपस्थित होता.

यावेळी बोलताना आमदार राणे म्हणाले लायन या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेचे कार्य 210 देशात चालत आहे समाजात वावरताना आपण समाजाचे देणे लागतो ही सामाजिक जाणीव ठेवून लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्ग काम करत आहे. आजच्या सोहळ्यात विविध उत्पादित मालाला बाजारपेठ मिळण्याच्या उद्देशाने विविध स्टॉल सहभागी झाले आहेत. तसेच ऑटो इंडस्ट्रीज स्टॉलचा सुद्धा या ठिकाणी समावेश आहे, हे निश्चितच व्यवसायवृध्दीसाठी कौतुकास्पद आहे.

उपप्रांतपाल वीरेंद्र चिखले यांनी लायन्स क्लब कुडाळ सिंधुदुर्ग या सेवाभावी संस्थेने असे महोत्सव घेऊन शतकाकडे वाटचाल करावी अशा शुभेच्छा दिल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सांस्कृतिक चळवळीचे केंद्र आहे आणि अशा जिल्ह्यात लायन्स क्लबने समाजसेवा करतानाच असे महोत्सव घेऊन सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी कटिबद्ध झालेले दिसून येत आहे असे सांगून शुभेच्छा दिल्या. उद्योजक श्री परब यांनी लायन्सचे सेवाभावी कार्य अवर्णनीय असल्याचे सांगून बंद पडलेला चिपी विमानतळ सुरु झाला पाहिजे यासाठी आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले. अॅड भणगे यांनी गोवा राज्य पर्यटन दृष्ट्या अनेक उपक्रम राबवत आहेत असाच उपक्रम आपल्या सिंधुदुर्गात केला पाहिजे हा उदात्त दूरदृष्टीकोन ठेवून तेवीस वर्षापूर्वी लायन्स महोत्सवाला सुरुवात झाली असे सांगितले. सीए सुनील सौदागर अॅड अमोल सामंत यांनी सुद्धा लायन्सच्या कार्याचा धावता आढावा घेतला.

या महोत्सवात सिंधुदुर्गसह पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर या भागातील विविध खाद्य, ऑटो इंडस्ट्रियल स्टॉल सहभागी झाले आहेत. यावेळी सांगली येथील उद्योजक रमाकांत मालू यांच्या समृद्धी स्टॉलला आमदार निलेश राणे सह सर्व मान्यवरांनी भेट देऊन इतरही स्टॉलची पाहणी केली. ऑटो एक्सपो मध्ये नवीन लॉन्चिंग झालेल्या गाडीचे उद्घाटन आमदार राणे यांनी केले. यावेळी दोन गरजूंना आरोग्य उपक्रमातर्गत सस्थेच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली. या महोत्सवाची सुरुवात लायन्स पदाधिकारी डॉ विवेक पाटणकर यानी गणेश वंदनाने केली. ईशस्तवन लायन्स पदाधिकारी शोभा माने यांनी सादर केले. आभार लायन्स पदाधिकारी सीए सागर तेली यांनी मानले. वंदे मातरम या राष्ट्रगीताने उद्घाटन सोहळ्याची सांगता झाली.

*रोजगारसह चिपि विमानतळबाबत निश्चितच पाठपुरावा करणार आ. निलेश राणे. *

या ठिकाणी रोजगारचा प्रश्न मोठा आहे. 2014 मध्ये आम्ही रोजगाराचा प्रयत्न करत असताना काही प्रकल्प आणण्यासाठी गेली म्हणून आम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले. चांगले प्रकल्प जिल्ह्यात येत असतील त्याला विरोध न करता त्या प्रकल्पातून या ठिकाणी स्थानिकांना रोजगार कसा मिळेल यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आता यापुढे नवनवीन प्रकल्प आणण्यासाठी आणि येथील बेरोजगरी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न राहणार आहे. जिल्ह्याच्या विकासात असणारा चिपी विमानतळ आज बंद स्थितीत आहे. हा प्रकल्प राबवताना ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. शिवाय नजीकच मोपा विमानतळ झाल्यामुळे स्पर्धा वाढलेली आहे. या ठिकाणी कोणत्या सुविधा देता येईल यासाठी सुद्धा आम्ही माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे खासदार असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावण्याचा सातत्याने पाठपुरावा करणार आहे, असे आम निलेश राणे यानी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!