*कोकण Express*
*दोडामार्गात विनामास्क फिरणाऱ्या ६२ जणांना प्रत्येकी २०० रुपये आकारण्यात आला दंड*
*दोडामार्ग ः प्रतिनिधी*
महसूल, नगरपंचायत, पोलीस यांच्याकडून आज सोमवारी तब्बल ६२ विनामास्क फिरणा-यावर कारवाई करण्यात आली. प्रत्येकी २०० रुपये दंड आकारला जात आहे. दोडामार्ग गांधी चौक येथे ही कारवाई सुरू आहे.
तहसीलदार अरुण खानोलकर, मुख्याधिकारी शिवराज गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक, मंडळ अधिकारी राजन गवस आदी उपस्थित होते. सर्वांनी कोरोना प्रतिबंध नियमांचे पालन करावे असे आवाहन तहसीलदार अरुण खानोलकर यांनी केले आहे.