बांदा येथे वनविभागाने पकडले १६ माकड ; माकडांच्या उपद्रवामुळे नागरिकांनी केली होती मागणी

बांदा येथे वनविभागाने पकडले १६ माकड ; माकडांच्या उपद्रवामुळे नागरिकांनी केली होती मागणी

*कोंकण एक्सप्रेस*

*बांदा येथे वनविभागाने पकडले १६ माकड ; माकडांच्या उपद्रवामुळे नागरिकांनी केली होती मागणी*

*बांदा : प्रतिनिधी*

वनविभागाच्या जलद कृती दलामार्गत बांदा शहरातील आंगडीवाडी येथे १६ माकड पकडण्यात आली.माकडांपासून शेती बागायतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी ठाकरे शिवसेना बांदा शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी उपवनसंरक्षक नंदकुमार रेड्डी यांना शहरातील माकडांचा बंदोबस्त करणेबाबत निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार हि माकड पकड मोहीम राबविण्यात आली. आज देखील शहरात पकड मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती श्री काणेकर यांनी दिली.

काल दिवसभर ग्रामस्थांच्या मागणीनुसार शहरात माकड पकड मोहीम राबविण्यात आली. आंगडीवाडी येथील १६ माकडांना वनविभागाच्या जलद कृती दलाने जेरबंद केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, बांदा वनापाल प्रमोद सावंत यांच्यासह शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते. उपसरपंच राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन वन खात्याच्या पथकाचे आभार व्यक्त केले.

शहरात माकडांचे उपद्रव वाढला असून ज्या शेतकऱ्यांच्या शेती बागायतीत माकडांचा सातत्याने वावर आहे माझ्याकडे त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहन साईप्रसाद खांडेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!