*कोंकण एक्सप्रेस*
*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेची अप्रतिम बाल एकांकीका ‘ शिमगो’*
*कणकवली : प्रतिनिधी*
कणकवली विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेची ‘शिमगो ‘, ही बाल नाट्य चळवळीतील अप्रतिम बालनाट्य एकांकीका बॅ नाथ पै नाट्य स्पर्धेत प्रशालेचे बाल कलाकार आपल्या अभिनयाचे सर्व कला कौशल्ये पणाला लावून स्पर्धेत उतरले आहे . ‘शिमगो ‘ ही एकांकीका आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगाच्या पलिकडचा विचार करून काळाच्याही पुढे घेऊन जाणारे विचार प्रसिद्ध लेखक मनोज मेस्त्री यांनी मांडलेले आहेत.
पुराणातील पात्र साकारून आधुनिक विचारांची पेरणी या बाल नाट्यातून करण्यात आली आहे दिग्दर्शक राकेश काणेकर यांनी आधुनिक तंत्रांचा वापर करून उत्तम कला विद्यार्थ्यांकडून करून घेऊन संगीत नेपथ्य यांचा सुंदर मिलाफ या बाल एकांकीका मधून घडवून आणला आहे वेशभूषा आणि प्रकाश नियोजन उत्कृष्ट अरुल्यामुळे शिमगो हे बालनाट्य प्रेक्षकांच्या मनांचा ठाव घेणारे आहे.या बाल एकांकिकेला विशेष सहाय्य डॉ आराधना मेस्त्री मॅडम यांनी केले.सतत पाठपुरावा करून प्रशालेच्या बाल कलाकारांना प्रोत्साहन देऊन सुप्त कलेलेला वाव देणारे फारच मोलाची मदत करून नाथ पै एकांकीका स्पर्धेत उतरणे म्हणजे महाराष्ट्राची बाल रंगभूमी गाजविणे असाच अर्थ निर्माण होतो.मुख्याध्यापक पिराजी कांबळे सरांनी या एकांकीके साठी सतत प्रोत्साहन दिले तसेच प्रशाकेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्वांनीच मदतीचा हात देत प्रशालेतून नवनिर्माण कलाकार घडविण्याचा प्रयत्न केला आहे सर्वच बाल कलाकारांचे अभिनंदन.