*कोंकण एक्सप्रेस*
*काँग्रेसचे कार्यकर्ते उमेश साळगावकर यांचे निधन*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
येथील जयप्रकाश चौकातील घड्याळ व्यावसायिक तथा काँग्रेसचे कार्यकर्ते उमेश साळगावकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.ही घटना सकाळी साडेअकरा वाजता घडली.त्यांच्यावर गेले काही दिवस उपचार सुरू होते.मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
श्री.साळगावकर यांचा जयप्रकाश चौक परिसरात घड्याळ विक्री व दुरूस्तीचा व्यवसाय होता.तीन महिन्यापूर्वी त्यांना पक्षाघात झाला होता.त्यानंतर ते आजारी होते.त्यांच्यावर बेळगाव येथ उपचार सुरू होते.मात्र रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगी असा परिवार आहे.