*कोंकण एक्सप्रेस*
*सेवानिवृत्त सामाजिक वनीकरण अधिकारी गणपत पाटील यांचे निधन*
*कुडाळ : प्रतिनिधी*
केळबाईवाडी येथील रहिवासी सेवा निवृत्त सामाजिक वनीकरण अधिकारी रहिवासी कै.गणपत नारायण पाटील वय वर्षे 90 यांचे अल्पशा आजाराने कुडाळ येथील निवासस्थानी 21 डिसेंबर रोजी त्यांचे निधन झाले.
कुडाळ येथील सामाजिक वनीकरण विभागात त्यांनी अधिकारी पदावर अनेक वर्षे अधिकारी पदावर नोकरी केली होती.वलवण – दाजीपूर येथील ते मूळ रहिवासी असून ते गेली अनेक वर्षे कुडाळ केळबाईवाडी येथे स्थायिक झाले होते.त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुलगे,एक विवाहित मुलगी,सुना, जावई,नातवंडे ,पुतणे असा मोठा परिवार आहे.देवगड जामसंडे कॉलेजचे शिक्षक जयप्रकाश पाटील, कुडाळ येथील प्राथमिक शिक्षक सदानंद पाटील,कुडाळ येथील डॉ. गिरीधर पाटील यांचे ते वडील होत.