*कोंकण एक्सप्रेस*
*गुळदुवे ग्रामस्थांनी श्रमदानातून केली नदीची साफसफाई*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
गुळदुवे येथील नदी पात्रात दुतर्फा झाडी वाढल्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा विसर्ग योग्य प्रकारे होत नाही.त्यामुळे मोठ्या प्रमाणात पूरसदृश्य परिस्थितीला सामोरे जावे लागते.नदी पात्राच्या लगतच्या शेतीत पाणी घुसते व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.
याबाबत शासन स्तरावरून उपाय योजना व्हावी,अशी विनंती करुनही ठोस पावले उचलली जात नाही.त्यामुळे अखेर गावातील नदी पात्रातील सफाईचे काम गुळदुवे ग्रामस्थांनीच पुढाकार घेऊन श्रमदानातून मार्गी लावले.
या श्रमदानात रुपेश धर्णे,रवींद्र धर्णे,नंदू धर्णे,प्रशांत खोबरेकर, कमलकांत कोल्हे,दिलीप मामलेकर,मुकुंद धर्णे,अरुण धर्णे,रघुनाथ धर्णे, रमाकांत शेटकर,संतोष सावंत आदी ग्रामस्थ यांनी सहभाग घेतला.