*कोंकण एक्सप्रेस*
*मनोविकारतज्ज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांना ‘स्नेहसेतू जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर*
*सिंधुदुर्ग : प्रतिनिधी*
सिंधुदुर्गमधील सुप्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांना, मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्रातर्फ दिला जाणारा ‘स्नेहसेतू जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
कोल्हापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्री अनिरुद्ध पिंपळे आणि कोल्हापूरचे पोलीस अधिक्षक श्री महेंद्र पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूरमध्ये डॉ पाटकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.