*कोंकण एक्सप्रेस*
*देवरूखमध्ये हॉटेलला भीषण आग*
*देवरुख : प्रतिनिधी*
शहरातील एच.पी. पेट्रोलपंपासमोरील हॉटेल सोळजाईला शनिवारी रात्री 2.15 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. शॉर्टसकिटमुळे ही आग लागली असावी,असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आगीची माहिती देवरूख नगर पंचायत अग्निशमन विभागाला मिळताच नगर पंचायतीचे अग्निशमन दल घटनास्थळी अग्निशमन वाहनासह तत्काळ घटनास्थळी पोहोचले. साधारण तासाभराच्या प्रयत्नानंतर संपूर्ण आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले.नगर पंचायत अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहोचल्यामुळे आगीची भीषणता रोखण्यास मदत झाली. दुर्घटनाग्रस्त हॉटेलच्या शेजारील टायरचे दुकान तसेच अन्य दुकाने आगीपासून वाचवण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले.
नगर पंचायतीने आग लागल्याचे समजताच तत्काळ अग्निपंख बंबाने आग नियंत्रणात आणल्यामुळे या विभागाचे देवरूख परिसरातून कौतुक होत आहे.