विद्यार्थी घडविताना त्यांच्या मनातील खेळाडू ओळखा- आम.निलेश राणे

विद्यार्थी घडविताना त्यांच्या मनातील खेळाडू ओळखा- आम.निलेश राणे

*कोंकण एक्सप्रेस*

*विद्यार्थी घडविताना त्यांच्या मनातील खेळाडू ओळखा- आम.निलेश राणे*

*मालवण तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन संपन्न*

*मालवण : प्रतिनिधी*

विद्यार्थी घडविताना त्यांच्या मनातील खेळाडू ओळखून त्याप्रमाणे त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्यास भविष्यात आपल्या भागातून नावलौकिक प्राप्त खेळाडू बनण्यास वेळ लागणार नाही असे मत आमदार निलेश राणे यांनी न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे व्यक्त केले.मालवण तालुकास्तरीय शालेय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचे उद्घाटन न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत,आचरा पीपल्स असोसिएशन संस्थेचे कार्याध्यक्ष प्रदिप परब मिराशी, गटशिक्षणाधिकारी संजय माने,आचरा उपसरपंच संतोष मिराशी, जयप्रकाश परुळेकर,संजय मिराशी,स्थानिक स्कूल समिती सदस्य अर्जुन बापर्डेकर,डॉ.प्रमोद कोळंबकर महेश परब यांसह सर्व केंद्र प्रमुख,मुख्याध्यापक,शिक्षक पालक विद्यार्थी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार निलेश राणे यांनी आमदार झाल्या नंतर पहिल्यांदाच आचरा हायस्कूल येथे कार्यक्रमाला जाण्याचा योग आला.धी आचरा पीपल्स या संस्थेला १०८ वर्ष झालीत.इतकी वर्षे ही संस्था विद्यार्थ्यांच्या हिताचे काम करत आहे हे कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी त्यांनी संस्थेच्या हितासाठी सर्व तो परी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!