*कोंकण एक्सप्रेस*
*खारेपाटण येथे नाम.नितेश राणे यांचे होणार शाही स्वागत*
*जिल्हा भाजपा – कणकवली तालुका भाजपाची जय्यत तयारी*
*भाजपा जिल्हा चिटणीस संतोष कानडे यांची माहिती*
*कणकवली : प्रतिनिधी*
राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्यानंतर रविवारी 22 डिसेंबर रोजी सिंधुदुर्गात प्रथमच येत असलेल्या नामदार नितेश राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण येथे न भूतो असे डोळ्यांचे पारणे फेडणारे शाही स्वागत सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा आणि कणकवली तालुका भाजपाकडून करण्यात येणार असल्याचे भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा चिटणीस संतोष कानडे यांनी सांगितले.कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या हटके आणि ऐतिहासिक स्वागतासाठी जिल्हा भाजपा आणि कणकवली तालुका भाजपाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नंतर तब्बल 10 वर्षानंतर राणे कुटुंबातील नितेश राणे यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली आहे. नामदार नितेश राणेंच्या रूपाने भाजपाच्या जिल्ह्यातील स्थानिक आमदार असलेल्या नेतृत्वाला कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळाली आहे.हा आनंद भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते हटके पद्धतीने साजरे करणार आहेत.
22 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता खारेपाटण येथे नामदार नितेश राणे यांचे न भूतो असे शाही स्वागत केले जाणार आहे.या ऐतिहासिक स्वागत सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा चिटणीस संतोष कानडे यांनी केले आहे.