कुडाळातील धोकादायक विद्युत खांब तात्काळ हटवा – मंदार शिरसाट

कुडाळातील धोकादायक विद्युत खांब तात्काळ हटवा – मंदार शिरसाट

*कोंकण एक्सप्रेस*

*कुडाळातील धोकादायक विद्युत खांब तात्काळ हटवा – मंदार शिरसाट*

*सार्वजनिक बांधकाम व महावितरणला निवेदन सादर*

*कुडाळ : प्रतिनिधी*

शहरात हॉटेल आरएसएन ते संत राऊळ महाराज चौक रस्त्यावरील कॉक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर विद्युत खांब तसेच ठेवण्यात आले आहेत. याकडे कुडाळ नगर पंचायतचे आरोग्य सभापती मंदार शिरसाट यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे आणि महावितरण विभागाचे लक्ष वेधले आहे.हे विद्युत खांब लवकरत लवकर हटविण्याची मागणी त्यांनी निवेदनाव्दारे केली आहे.

त्यात असे म्हटले आहे की,कुडाळ शहरात हॉटेल आरएसएन ते संत राऊळ महाराज चौक रस्त्यावरिल कॉक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर विद्युत खांब तसेच ठेवण्यात आले आहेत व त्या विद्युत खांबांमुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे.त्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम कनिष्ठ अभियंता मोहिते यांना निवेदन देण्यात आले. तसेच महावितरणचे विद्युत अभियंता श्री. वनमोरे यांच्याशी फोन द्वारे संपर्क करून संबंधित धोकादायक काम हटवण्यासंदर्भात आरोग्य सभापती मंदार श्रीकृष्ण शिरसाठ यांनी चर्चा केली आहे. यावेळी बांधकाम सभापती उदय मांजरेकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!