*कोंकण एक्सप्रेस*
*विद्यामंदिर इंग्लिश स्कूल कणकवली या प्रशालेचा वार्षिक बक्षिस वितरण समारंभ संपन्न*
*समारंभाला माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ कविता शिंपी यांची उपस्थिती*
*कणकवली : प्रतिनिधी*
विद्यामंदिर इंग्लिश स्कूल कणकवली या प्रशालेचा वार्षिक बक्षिस वितरण समारंभ माध्यमिक शिक्षणाधिकारी आदरणीय सौ शिंपी मॅडम या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.या वेळी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.नर्सरी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेतून प्राविण्य प्राप्त केलेली होती.शिक्षणाधिकरी सौ शिंपी मॅडम यांच्या शुभहस्ते विद्यार्थांना बक्षिसे वितरित करण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करतांना आजच्या काळात इंग्रजी शिक्षणाचे महत्व आणि विद्यार्थांचा मोबाईल वापराबद्दल असणाऱ्या समस्या या विषयी आपल्या ओघवत्या शैलीत विद्यार्थी व ‘पालकांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा विजयकुमार वळंजू साहेब यांनी इंग्रजी शाळेची संस्थेला गरज का वाटली, सामान्य पालकांना कणकवली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्जेदार इंग्लिश स्कूलची स्थापना करून सर्वांची उत्तम सोय केल्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना आदर्श घडविणारे शिक्षण मिळत जावे तसेच संगणक आणि मोबाईल यांच्या वापरातून आवश्यक त्या ज्ञानसाधनेचा वापर करून आपले जीवन समृद्ध करावे या विषयी मार्गदर्शन केले.संस्थेचे विश्वस्त मा.अनिलपंत डेगवेकर साहेब यांनी आधुनिक शिक्षणाच्या सुविधा आणि शिक्षणाचा आदर्श विचार या विषयी मार्गदर्शन केले.कणकवली कॉलेजचे प्राचार्य महालिंगे सरांनी नविन राष्ट्रीय शिक्षणाचे महत्व आणि इंग्रजीभाषा व माध्यम या विषयी मार्गदर्शन करून विद्यार्थांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या दिव्या राणे मॅडम यांनी करून प्रशालेचा आदर्श कथन केला.या कार्यक्रमाला मुख्याध्यापक पी जे कांबळे सर पर्यवेक्षिका वृषाली जाधव मॅडम जेष्ठ शिक्षक अच्युतराव वणवे सर सिंगनाथ सर शेळके जे जे सर व इंग्लिश स्कूलचे सर्वशिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.