*कोंकण एक्सप्रेस*
*राज्य शासनाने मराठवाडा व विदर्भासहित कोकण विभागाचा समावेश दूध उत्पादन प्रकल्पांसाठी करावा – आम.निलेश राणे*
*नागपूर*
दूध उत्पादन प्रकल्पासाठी राज्य शासनाने मराठवाडा व विदर्भ या दोन विभागांची निवड केली आहे.कोकणात सुद्धा मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन होत.हे दुध उत्पादन अधिक वाढू शकत.याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मराठवाडा व विदर्भासहित कोकण विभागाचाही समावेश दूध उत्पादन प्रकल्पांसाठी करावा अशी मागणी आज आमदार श्री.निलेश राणे यांनी विधिमंडळात केली.