*कोंकण एक्सप्रेस*
*अमित शहांच्या “त्या” वक्तव्याचा मालवण काँग्रेसच्या वतीने निषेध*
*मालवण : प्रतिनिधी*
संसदेमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला.याबाबत शहा यांनी माफी मागावी अन्यथा ते ज्यावेळी सिंधुदुर्गात येतील त्यावेळी त्यांना काळे झेंडे दाखवण्यात येतील, असा इशारा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
संसदेत सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे.या दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणा दरम्यान डॉ.आंबेडकर यांच्याबाबत केलेले वक्तव्य हे अससंदिय व शहा यांच्या पदाला शोभणारे नाही.एखाद्या महान व्यक्ती वरून अथवा देवदेवता धर्म यांवरून संसदेत बोलण हे योग्य नाही.या प्रकाराबाबत अमित शहा यांनी माफी मागावीअन्यथा सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्यावेळी ते येतील त्यावेळी त्यांना काळे झेंडे दाखवण्यात येतील.
शहा यांच्या वक्तव्यामुळे जनभावना दुखावल्या असून अनेकांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. पंतप्रधानांनी शहा यांचा राजीनामा घ्यावा. आज मालवण बस स्थानक येथील मुख्य रस्त्यावर तोंडाला काळे मास्क लावून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा घेत अमित शहा यांच्या निषेधाचे कार्ड हातात धरून निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष देवानंद लुडबे, युवक तालुकाध्यक्ष श्रेयस माणगावकर, मधुकर लुडबे, सरदार ताजर, लक्ष्मीकांत परुळेकर, बाबा मेंडीस, दीपाली परब व इतर पदाधिकारी उपस्थित होते.