*कोंकण एक्सप्रेस*
*स.का.पाटील महाविद्यालय मालवण येथील अविष्कार संशोधन महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद*
*मालवण : प्रतिनिधी*
मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात १९ व्या अविष्कार संशोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.यात सिंधुदुर्ग महाविद्यालयातील चार प्रकल्पांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली.या आंतर-महाविद्यालयीन संशोधन स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधील पदवी व पदव्युत्तर स्तरातील एकूण ६८ संघांतील १३८ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.या स्पर्धेत सहा विभागांसाठी १३ परीक्षकांनी सखोल परीक्षण करून निकाल जाहीर केला.
मानव्यशास्त्र,भाषा आणि ललित कला विभागासाठी डॉ. सचिन लबडे,डॉ.राजेश भोईटे आणि डॉ.पांडुरंग चौधरी यांनी परीक्षण केले. वाणिज्य,व्यवस्थापन आणि कायदा विभागासाठी डॉ.राज सोष्टे,डॉ. राहुल शेट्टी आणि डॉ.सम्राट जाधव यांनी योगदान दिले.Pure Science विभागासाठी डॉ.विशाल कांबळे,डॉ.राजाराम गुरव,डॉ. रोहन जाधव यांनी परीक्षण केले.कृषी व प्राणीपालन,अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, तसेच वैद्यकशास्त्र व फार्मसी विभागासाठी डॉ.विनोद गोकर्ण, डॉ.रोहन गावकर, डॉ.प्रज्ञा कोर्लेकर, डॉ.योगेश गजमल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
सिंधुदुर्ग जिल्हा विभागीय फेरीत विविध विभागांमधून निवडलेली महाविद्यालये अशी – मानव्यशास्त्र, भाषा आणि ललित कला (UG) : संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ, कणकवली महाविद्यालय, कणकवली, श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी, कला व वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट, कॉमर्स, मॅनेजमेंट अँड लॉ (UG): एस.के.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण (२ संघ), Pure Science (UG): श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी,स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण, आनंदीबाई रावराणे कला व वाणिज्य महाविद्यालय, वैभववाडी, संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ. कृषी व पशुपालन (UG): आनंदीबाई राव राणे महाविद्यालय, वैभववाडी, कणकवली महाविद्यालय, कणकवली. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान (UG): संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ,श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी, मेडिसिन व फार्मसी (UG): कणकवली महाविद्यालय,कणकवली.
बक्षीस वितरण सोहळ्यात मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.सुनील पाटील,परीक्षक डॉ. प्रज्ञा कोर्लेकर, जिल्हा समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर शिरसट,प्राचार्य डॉ.शिवराम ठाकूर, सांस्कृतिक विभाग समन्वयक डॉ.आशिष नाईक,डॉ.सुमेधा नाईक, प्रा. कैलास राबते, आणि प्रा.प्रमोद खरात या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाना बक्षीस वितरण करण्यात आले.
डॉ.प्रज्ञा कोर्लेकर यांनी नवसंशोधक विद्यार्थ्यांना प्रेरणादायक मार्गदर्शन केले. डॉ.सुनील पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील विद्यापीठ स्तरीय फेरीसाठी शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवराम ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुमेधा नाईक, सर्व सीनियर व जूनियर विभाग प्राध्यापक, एनएसएस स्वयंसेवक, एनसीसी कॅडेट्स, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. प्रतिनिधी कुमारी निकिता शर्मा आणि सौरभ चव्हाण यांनी विशेष योगदान दिले. कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, सचिव चंद्रशेखर कुशे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अॅड. समीर गव्हाणकर, तसेच इतर संस्था पदाधिकाऱ्यांनी या अविष्कार संशोधन स्पर्धेतील यशाबद्दल समितीचे अध्यक्ष अॅड. समीर गव्हाणकर, तसेच इतर संस्था पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
या भव्य संशोधन महोत्सवाच्या आयोजनातून विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाविषयीची जिज्ञासा आणि नवनवीन संधींचा शोध यासाठी प्रेरणा निर्माण झाली.