विद्यार्थी सेवा प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या अध्यक्षपदी कर्पुरगौर जाधव सचिवपदी रविंद्रनाथ गोसावी यांची निवड

विद्यार्थी सेवा प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या अध्यक्षपदी कर्पुरगौर जाधव सचिवपदी रविंद्रनाथ गोसावी यांची निवड

*कोंकण एक्सप्रेस*

*विद्यार्थी सेवा प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या अध्यक्षपदी कर्पुरगौर जाधव सचिवपदी रविंद्रनाथ गोसावी यांची निवड*

*कासार्डे : प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता विकास, त्यांच्यातील विविध कलागुणांना चालना देणे, होतकरू मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, तसेच स्पर्धा परिक्षांची प्राथमिक स्तरावर पायाभरणी करणे अशा उदात्त हेतूने विद्यार्थी सेवा प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या नूतन संस्थेची स्थापना करण्यात आली.

उपक्रमशील शिक्षक श्री एकनाथ जानकर व समविचारी शिक्षक मित्र परिवार यांच्या पुढाकातून या संस्थैची स्थापना करण्यात आली आहे..सिंधुदुर्ग जिल्हातील प्राथमिक शिक्षण घेणारी मुले त्यांचे विविध प्रश्न मुलांच्या शिक्षणासाठी शासकीय योजनांची अंमलबजावणी होत असताना राहणा-या त्रुटी, विद्यार्थ्यांच्या समस्या या संदर्भात ही संस्था भविष्यात कार्य करणार आहे. तसेच शाळा व शिक्षक यांना प्रोत्साहन देवून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रशासनाच्या मदतीने भविष्यात अनेक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे अध्यक्ष श्री. कर्पुरगौर जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहिर केले आहे.

संस्थेची नूतन कार्यकारीणीमध्ये उपाध्यक्ष पांडूरंग चिंदरकर, कोषाध्यक्ष रामचंद्र झोरे, कार्याध्यक्ष दिपक बोडेकर, प्रसिद्धी प्रमुख विजय म्हस्के, तसेच सल्लागार झिलू गोसावी यांची निवड करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!