*कोंकण एक्सप्रेस*
*नामदार नितेश राणेंचे भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी केले अभिनंदन*
*कणकवली : प्रतिनिधी*
नामदार नितेश राणे यांची महाराष्ट्र राज्य सरकार मध्ये मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी आपल्या सहकाऱ्यांसह अभिनंदन केले.नागपूर येथे नामदार नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेत मेस्त्री यांनी पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले.
यावेळी सोशल मीडिया जिल्हा प्रमुख समीर प्रभुगावकर, साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दम,कलमठ उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,उपतालुकाध्यक्ष संदीप सावंत, भाजपा युवा मोर्चा कणकवली तालुकाध्यक्ष सर्वेश दळवी आदी उपस्थित होते.