*कोंकण एक्सप्रेस*
*महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात आमदार नितेश राणेंची वर्णी लागल्यावर वेंगुर्लेत भाजपाच्या वतीने जल्लोष*
*वेंगुर्ला : प्रतिनिधी*
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात आमदार नितेश राणे यांची वर्णी लागल्यावर वेंगुर्ला शहरात भाजपाच्या वतीने ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करत लाडु आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
हा शपथविधी सोहळा पाहण्यासाठी वेंगुर्लेत भाजपा तालुका कार्यालयाच्या बाहेर स्क्रीन लावून शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.