*कोंकण एक्सप्रेस*
*अखेर शिंदेंची टीम झाली फायनल!*
*एकनाथ शिंदेनी मंत्रिपदासाठी ‘या’ नेत्यांना केले फोन*
*तर एकनाथ शिंदे यांनी दीपक केसरकर,तानाजी सावंत यांच्यासह दिग्गजांना दिला दे धक्का,*
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या मंत्रिमंडळात मागच्या कार्यकाळात मंत्री राहिलेल्या 9 जणांना डच्चू मिळणार आहे. यात भाजपचे 3 मंत्री असणार आहेत.
एकनाथ शिंदे गटाचे सर्वाधिक 4 मंत्री असणार आहेत. तर अजित पवार गटाच्या 2 मंत्र्यांना नव्या मंत्रीमंडळातून डच्चू मिळू शकतो.*
मुंबई:—विधानसभा निवडणुकांमध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आज 15 डिसेंबर रोजी महायुती सरकारमधील नवनिर्वाचित मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. आज संध्याकाळी 4 वाजता शपथविधी सोहळा होणार आहे.दरम्यान, राजकीय घडामोडींना वेग आलाय.
गेल्या दोन दिवसांपासून मंत्रीपदासाठी आमदारांची लॉबिंग सुरु असल्याची चर्चा होती. वर्षा, सागर बंगल्यावर शिंदेगटाच्या आमदारांची वर्दळ होती.आता शपथविधीच्या दिवशी शिंदे गटाची टीम फायनल होत आली आहे.
मंत्रिपदासाठी शिंदेगटाकडून काही आमदारांना फोन गेले आहेत. यात कोणाचा नंबर लागला? अन् कोणाचा पत्ता कट झाला? संभाव्य मंत्र्यांची नावं..*
रात्रभर अनेकांनी मंत्रिपदाची माळ गळ्यात पडावी यासाठी लॉबिंग केले.थंडीच्या कडाक्यातही नागपूरमध्ये वातावरण तापले. नागपूरमध्ये मंत्रिमंडळाच्या शपथविधीची ही दुसरी वेळ आहे.
शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या 12 आमदारांना फोन गेल्याची माहिती भरतशेठ गोगावले यांनी दिली. यामध्ये सहा नवीन चेहऱ्यांना तर माजी मंत्र्यांना सुद्धा संधी देण्यात आल्याचे समोर आले आहे.
पण या यादीत दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट झाल्याचे दिसून येत आहे.*
महायुतीच्या मंत्रिमंडळात भाजपचे 21, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 10 मंत्री असणार आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांना संबंधित पक्षाचे वरिष्ठांचे फोन जाण्यास सुरुवात झाली आहे. याचदरम्यान आज भाजपसह शिवसेना शिंदे गटाची यादी समोर आली आहे.
शिवसेनेत 5 जुने मंत्री आणि 7 नवीन आमदारांना म्हणजे एकुण 12 जणांना संधी मिळणार आहे.*
*या आमदारांना गेले शिंदेगटाकडून फोन*
*🔴1. उदय सांमत*
*🔴2. प्रताप सरनाईक*
*🔴3. शंभूराज देसाई*
*🔴4. योगश कदम*
*🔴5. आशिष जैस्वाल*
*🔴6. भरत गोगावले*
*🔴7. प्रकाश आबिटकर*
*🔴8. दादा भूसे*
*🔴9. गुलाबराव पाटील*
*🔴10. संजय राठोड*
*🔴11. संजय शिरसाट*
*पाच जुन्या मंत्र्यांना मिळणार पुन्हा संधी*
*🔴1. उदय सामंत, कोकण*
*🔴2. शंभुराजे देसाई, पश्चिम महाराष्ट्र*
*🔴3. गुलाबराव पाटील, उत्तर महाराष्ट्र*
*🔴4. दादा भुसे, उत्तर महाराष्ट्र*
*🔴5. संजय राठोड, विदर्भ*
*या नेत्यांचा पत्ता कट?*
*शिवसेना शिंदे गटाकडून यंदा कॅबिनेट मंत्रीपदी या आमदारांना पुन्हा संधी नसल्याची शक्यता आहे.*
*🔴1. दीपक केसरकर*
*🔴2. तानाजी सावंत*
*🔴3. अब्दुल सत्तार*
*शिंदेगटाची मंत्रिपदाची यादी ठरली*
*भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या मंत्रिपदासाठीच्या आमदारांची यादी फिक्स झाली असून आपापल्या पक्षाकडून संभाव्य आमदारांना फोन जात आहेत.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदेगटाच्या संभाव्य मंत्र्यांची नाव फिक्स झाली असून १२ आमदारांना शिंदे गटाकडून फोन गेले आहेत.*
*मंत्रिमंडळात भाजपचे 21 शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादीचे 10 मंत्री*
मंत्रिमंडळात भाजपचे 21 शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादीचे 10 मंत्री असणार आहेत. त्यापैकी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलीय. त्यामुळे आता भाजपचे 20, शिवसेनेचे 11 तर राष्ट्रवादीचे 9 आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे.
नागपूरच्या राजभवनात दुपारी तीननंतर हा शपथविधी होणार असून राजभवनाच्या प्रशस्त लॉनवर याची जोरदार तयारी करण्यात आलीय. याआधी 1991 मध्ये शिवसेनेतल्या फुटीनंतर नागपुरात शपथविधी झाला होता .यानंतर 33 वर्षांनंतर मंत्रिमंडळाचा शपथविधी हा नागपुरात होणार आहे.*
*मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच नागपूरात*
*मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे आज पहिल्यांदा नागपूर मध्ये आगमन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे.
देवेंद्र फडणवीसांचे निवासस्थान असलेल्या धरमपेठ भाग पूर्णता भगवामय झाल्याचे पाहायला मिळत आहे.*