*कोंकण एक्सप्रेस*
*निगुडे येथील श्री देवी माऊलीचा जत्रोत्सव १५ डिसेंबरला*
*कुडाळ : प्रतिनिधी*
निगुडे गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली चा वार्षिक जत्रोत्सव रविवार दिनांक १५ डिसेंबर २०२४ रोजी होणार असून सकाळी विविध देवीची पूजा, ओटी भरणे कार्यक्रम, तसेच रात्री पालखी प्रदक्षिणा असे विविध कार्यक्रमाने जत्रोत्सव संपन्न होणार आहेत.
त्याचप्रमाणे रात्रौ आजगावकर दशावतर नाट्य मंडळ आजगाव यांचा महान पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे तरी सर्वांनी जत्रोत्सवाला सर्व भाविकांनी भक्तगणांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे.