*कोंकण एक्सप्रेस*
*सायबर गुन्ह्यांबाबत पथनाट्यातून जागृती*
*आचरा पोलीस स्टेशन आणि न्यू इंग्लिश स्कूल आचराचा पुढाकार*
*मालवण : प्रतिनिधी*
दिवसेंदिवस वाढत्या सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती व्हावी,याबाबत कोणती सावधगिरी बाळगावी, डायल ११२ बाबत माहिती देत त्याचा उद्देश स्पष्ट करत आचरा पोलीस स्टेशनच्या पुढाकाराने न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी आचरा आठवडा बाजाराचे औचित्य साधत आचरा तिठा येथे पथनाट्यातून जनजागृती केली.यावेळी लोकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात सायबर,अंमली पदार्थ जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे.आचरा येथे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली आचरा पोलीस स्टेशन हद्दीतील गावांमध्ये शाळा,कॉलेज,सामाजिक संस्था,व्यापारी संघटना यांच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती केली जात आहे.गुरुवारी आचरा आठवडा बाजाराचे औचित्य साधून न्यू इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आचरा तिठा येथे पथनाट्यातून जनजागृती केली गेली. यात नशामुक्ती, सायबर गुन्हेगारी, डायल ११२बाबत जनजागृती केली गेली. संकटकाळी डायल ११२ कार्यप्रणालीचा वापर करुन पोलीस मदत मागून घेण्याचे आवाहन केले.
यावेळी आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विशाल चोरगे, पोलीस कर्मचारी सौ मिनाक्षी देसाई,मिलिंद परब,मनोज पुजारे,सौ आचरेकर, मुख्याध्यापक गोपाळ परब, उपमुख्याध्यापक घुटूकडे, शिक्षिका भावना मुणगेकर यांसह विद्यार्थी बहुसंख्येने सहभागी झाले होते.