*कोकण Express*
*धडकी भरवणारी आकडेवारी; २७ दिवसांनंतर पहिल्यांदाच करोनाबाधितांची संख्या १४ हजारांवर*
▪️देशामध्ये पुन्हा एकदा करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून ही वाढ धडकी भरवणारी आहे. भारतामध्ये मागील २४ तासांमध्ये म्हणजेच शुक्रवारी (१९ फेब्रुवारी २०२१) जवळजवळ १४ हजार नवे करोना रुग्ण सापडले आहेत. करोनाबाधितांची दैनंदिन वाढ मागील २७ दिवसांमध्ये पहिल्यांदाच १४ हजारांच्या आसपास गेली आहे. महाराष्ट्र, पंजाब आणि मध्य प्रदेशमध्ये करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. भारतामध्ये शुक्रवारी करोनाचे १३ हजार ९९३ रुग्ण आढळून आलेत. मागील २७ दिवसांमधील ही सर्वात मोठी वाढ आहे. शुक्रवारी एका दिवसात देशामध्ये १०१ जणांचा करोनामुळे मृत्यू झालाय.