*कोंकण Express*
*कणकवली परबवाडी येथील श्री दत्तमंदिरात दत्तजयंती उत्सवाचे आयोजन*
*कणकवली : प्रतिनिधी*
येथील श्री दत्तमंदिर परबवाडी येथे श्री दत्त जयंती उत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील साजरा करण्यात येणार आहे.यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी ७ वाजता श्रींचा अभिषेक,सकाळी १० वाजता झोळी फिरणे,सायंकाळी ६:०२ वाजता दत्तजन्म, रात्रौ ८ वाजता महाप्रसाद,रात्रौ ९:३० वाजता भजनांचा कार्यक्रम अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उत्सवास उपस्थित राहावे असे आवाहन कणकवली येथील शिवाजीनगर,परबवाडी मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.