*कोंकण Express*
*रोटरी क्लब मालवणतर्फे २१ रोजी वक्तृत्व स्पर्धा*
*मालवण : प्रतिनिधी*
केवळ देशाच्या प्रगतीचाच वसा घेतलेल्या व सतत दूरदृष्टी ठेवून, प्रवाहाविरुद्ध पोहत राहून प्रवाहाचीच दिशा बदलणारे ध्येयवेडे उद्योगपती रतनजी टाटा यांचे प्रेरणादायी कार्य विद्यार्थ्यांना समजण्यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित वक्तृत्व स्पर्धा २१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता येथील कन्याशाळा येथे घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा रोटरी क्लब मालवणने आयोजित केली असून संजय गावडे यांनी पुरस्कृत केली आहे.
या स्पर्धेसाठी ‘रतन टाटा : प्रेरणादायी व्यक्तिमत्व’ हा विषय असणार आहे.शाळेतून प्रत्येक गटामध्ये २ विद्यार्थी सहभागी होऊ शकतील.हि स्पर्धा दोन गटांत होईल.पहिला गट पाचवी ते सातवी (वेळ ३ मिनिटे), दुसरा गट आठवी ते दहावी (वेळ ४ मिनिटे) असणार आहे.पाचवी ते सातवी गट प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे ७००, चषक, ५००, ३०० रुपये तसेच आठवी ते दहावी गटासाठी प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे १००० रुपये व चषक, ७००, ५०० रुपये व सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लिमये हॉस्पिटल, मालवण-९४२२०७६८०५ येथे नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.