आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून गाव विकासाचा शब्द पुर्ण होणार!

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून गाव विकासाचा शब्द पुर्ण होणार!

*कोंकण Express*

*आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून गाव विकासाचा शब्द पुर्ण होणार!*

*शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची माहिती*

*मालवण : प्रतिनिधी*

गेल्या दहा वर्षात कुडाळ मालवण मतदार संघात रखडलेला विकास करण्याची धमक आमदार राणे यांच्यात असल्याने जनतेने साथ दिली, विजय निश्चित केला.जनतेला अपेक्षित विकास साध्य करत असताना शिवसेना पक्ष संघटना मजबूत करण्यावर अधिक लक्ष दिले जाणार आहे.गाव तेथे शिवसेना शाखा बांधणी करण्यात येणार आहे.गावागावात पक्ष संघटनेची बैठक आयोजित करून गावाचा पाठिंबा असणार त्यालाच शाखाप्रमुखपद देण्यात येणार आहे.आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच कुडाळ मालवण मतदार संघातील प्रत्येक गावात बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे.अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली.

कुंभारमाठ येथील निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी दिपक पाटकर, बाळु बाईत, निलेश बाईत, प्रशांत परब, आकाश परब, जयेश घाडी, संतोष साटविलकर, सदा नाईक, संतोष कोदे, जेरॉन फर्नाडीस, राजू देसाई, सुशांत घाडीगावकर, सचिन धुरी, दिपक सावंत, गुरु घाडीगावकर, चंड्या पडवळ, बाळा वेंगुर्लेकर, रामा राऊळ, नंदु आंगरी, मिहीर राणे, प्रकाश परुळेकर, संतोष मिराशी, अजित घाडी, प्रकाश कासले, प्रकाश किर्लोस्कर, वैभव पाटकर, राजु राठिवडेकर, प्रफुल्ल प्रभू, केशव परब, चंद्रकांत झारंगे, अनिल सुकाळी, गोविंद चव्हाण, बाळा राऊत, गुरुदास घाडी, प्रशांत पडवळ, काशिनाथ चव्हाण, गणेश चव्हाण, संजय ठाकूर, बाबु परब, पुरुषोत्तम शिंगरे, सुर्यकांत चव्हाण, महादेव चव्हाण, अविनाश चव्हाण, विजय चव्हाण, मंदार लुडबे आदी उपस्थित होते.

गेल्या दहा वर्षात मालवण कुडाळ मतदार संघ विकासाकामांमध्ये मागे राहिला आहे. गावागावातील रस्ते, साकव पाण्याचे प्रश्न तसेच इतरही अनेक कामे राहिलेली आहेत. प्रचारादरम्यान सर्व गावातील जनतेकडून सातत्याने आमच्याकडे सहकार्य मागण्यात आले. आम्ही आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जनतेचे प-श्न सोडविण्याचे आश्वासन दिलेले आहे. यामुळे आमदार नीलेश राणे हे सदरच्या प्रश्नांसाठी निधी उपलब्ध करून जनतेला दिलेला शब्द पूर्ण करणार आहेत. गावागावातून कामांची माहिती घेऊन जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही कार्यरत होणार आहोत, असेही श्री. सामंत म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्हयातील तीन्ही मतदार संघामध्ये महायुतीचे उमेदवार विजयी झाल्याने जनतेने महायुतीला आशिर्वाद दिलेला आहे. आमच्या विभागातील दोन्ही मतदार संघात भरमरून जनतेने मते दिली आहेत.कणकवलीत आमदार नितेश राणे यांनी हॅट्रिक केली. मालवण कुडाळ मतदार संघावर आमदार निलेश राणे यांच्या विजयाने शिवसेनेचा धनुष्यबाण फडकला आहे. तसेच सावंतवाडी मतदार संघातही दिपक केसरकर, यांनी विजयाचा चौकार मारला आहे. यामुळे आम्ही जनतेच्या प्रती ऋणी असून सिंधुदुर्गाच्या विकासाचे स्वप्न खासदार नारायण राणे यांनी ज्या पद्धतीने पाहिलेलं आहे, ते पूर्ण करण्यासाठी महायुतीकडून प्रयत्नशिल आहोत असेही श्री.सामंत म्हणाले.

*गाव तिथे शाखा*

मालवण कुडाळ मतदार संघातील सर्व गावांमध्ये शिवसेना संघटना मजबूत करण्यासाठी आमदार नीलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकांमध्ये गावातील समस्य आणि त्यावर उपाययोजना तसेच शाखाप्रमुख आणि संघटनाबांधणीमध्ये कार्यकर्ते व ग्रामस्थांचे विचार विचारात घेऊन पदाधिकारी नियुक्ती करण्यात येणार आहे. आगामी नि लक्षात घेत पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, असेही श्री.सामंत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!