विद्यार्थ्यांप्रती पालकांनी सजग राहणे गरजेचे -डाॅ.पुरंधर नारे

विद्यार्थ्यांप्रती पालकांनी सजग राहणे गरजेचे -डाॅ.पुरंधर नारे

*कोंकण Express*

*विद्यार्थ्यांप्रती पालकांनी सजग राहणे गरजेचे -डाॅ.पुरंधर नारे*

*फोंडाघाट : प्रतिनिधी*

येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटमध्ये शिक्षक-पालक सभा संपन्न झाली.विद्यार्थी शिक्षक व पालक यांच्यातील सुसंवाद वाढण्यासाठी अशा सभांचे आयोजन करण्यात येते.आपला पाल्य महाविद्यालयात काय करतो ? याची प्रगती कशी आहे ? त्याच्या अन्य प्रगतीत काय करता येईल ? याची थेट चर्चा शिक्षकांबरोबर करता येते.त्याचबरोबर शिक्षकांशी पालकांचा संवाद वाढतो.

या सभेला संबोधित करताना प्रा.विनोद पाटील यांनी महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध शिष्यवृत्ती संदर्भात माहिती दिली.विद्यार्थी ही माहिती पालकांपर्यंत पोहोचवत नाही आणि ऐनवेळी कागदपत्रांची जमावा जमाव करताना तारांबळ उडते व दरम्यानच्या काळात तारीख निघून जाते आणि आर्थिक नुकसान होते. अशावेळी पालकांनी जागरूक राहणे आवश्यक आहे. पाल्याच्या अभ्यासात ही नियमितपणे लक्ष दिला पाहिजे. पालकांचा थोडा तरी पाल्यांवर वचक राहण्यास मदत होते. त्याचबरोबर महाविद्यालयातील सर्व विभागांची माहिती दिली.

त्यानंतर प्राचार्य डॉ. पुरंधर नारे म्हणाले की विद्यार्थी हा आपले भविष्य असते. हे भविष्य खरं म्हणजे आमच्या हातात दिले आहे. ते आमचे हात आणि घडणारी मुलं यांची जोड गोळी कशाप्रकारे काम करते हे पाहण्यासाठी आपल्यातील संवाद आवश्यक आहे. असा सुसंवाद पाल्यांची प्रगतीत मदत करतो. महाविद्यालय अनेक छोटे छोटे व्यवसायभिमुख कोर्सेस सुरू करून विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनापासूनच अर्थाजनची संधी उपलब्ध करून देत असते. अशा संधीचा आपले पाल्य उपयोग करून घेते का यावर पालकांचा लक्ष असला पाहिजे असे कोर्सेस महाविद्यालयातून विनामूल्य दिले जातात हेही आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. त्याचे उदाहरण देताना आत्ताच नव्याने सुरू केलेला नवीन स्किल बेस कोर्स याचाही उल्लेख प्राचार्यांनी केला. आपले पाल्य मोठे झाले तर पालकांबरोबर त्यांना घडवणाऱ्या शिक्षकालाही खूप आनंद होत असतो. असे प्रतिपादन केले.

डॉ. सतीश कामत म्हणाले की पाल्य महाविद्यालयात आल्यानंतर पालक म्हणून आपण थोडे शिथिल होतो परंतु असे होणे योग्य नाही. उलट जबाबदारी वाढते त्यामुळे किमान अशा सभांना पालकांनी उपस्थित असणे आवश्यक आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजाराम पाटील यांनी तर आभार डॉ. सतीश कामत यांनी मानले. सभेला महाविद्यालयाचा सर्व कर्मचारी वर्ग व पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!