*कोंकण Express*
*सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
सावंतवाडी येथे पत्रकार संघाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराचा २५ हून अधिक पत्रकारांनी लाभ घेतला. पत्रकारांनी धकाधकीच्या जीवनात नेहमीचे काम करत असताना आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी,असे आवाहन उपस्थित मान्यवरांकडून करण्यात आले.या शिबिराचे उद्घाटन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नवयुग एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष उदय भोसले,मराठी पत्रकार परिषद,मुंबईचे माजी राज्य अध्यक्ष गजानन नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे सहकार्यवाह तथा युवा नाट्यकर्मी प्रवीण मांजरेकर,तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे स्त्री रोग तज्ञ डॉ.ज्ञानेश्वर ऐवाळे तसेच सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर,सचिव मयूर चराटकर,खजिनदार रामचंद्र कुडाळकर, कार्यकारणी सदस्य मंगल कामत,दिव्या वायंगणकर,विजय राऊत, गुरु पेडणेकर,नरेंद्र देशपांडे,हर्षवर्धन धारणकर,मोहन जाधव, विश्वनाथ नाईक,अर्जुन राऊळ,प्रसन्न गोंदावळे,जीवन रक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर,गुरुदत्त कामत आदी उपस्थित होते.