अद्भुत उत्साहात कणकवली सकल मराठा समाजाच्यावतीने शिवजयंती साजरी

अद्भुत उत्साहात कणकवली सकल मराठा समाजाच्यावतीने शिवजयंती साजरी

*कोकण Express*

*अद्भुत उत्साहात कणकवली सकल मराठा समाजाच्यावतीने शिवजयंती साजरी….!*

*जय भवानी… जय शिवाजीचा…जयघोष….!*

*मराठा शिक्षक संघाच्यावतीने चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धेचा शुभारंभ…!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

सकल मराठा समाज कणकवलीच्यावतीने आज मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. कणकवली छत्रपती शिवाजी चौका समोरील ब्रिज खाली झालेल्या कार्यक्रमावेळी समाजचे जेष्ठ मार्गदर्शक एस.टी. सावंत यांच्या हस्ते छत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. छत्रपतींचा जयघोष करत ही अद्भुत उत्साहात शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला.

यावेळी सकल मराठा समाजाचे भाई परब,महेंद्र सांब्रेकर, बबलू सावंत,सुशील सावंत,ब्बचु प्रभुगावकर,सोनू सावंत,महेश सावंत,तेजस राणे,समीर सावंत,संदीप राणे,सुशांत दळवी,संतोष राऊळ,सायली सावंत,शैली सावंत,स्वाती राणे,आदीसह मराठा शिक्षक संघाचे दत्ता सावंत,ए. डी. राणे,प्रशांत दळवी,सुहास सावंत,शिवाजी मडव, शाम सावंत,विजय भोगले,रामचंद्र आंगणे,प्रतीक्षा तावडे,दिनेश सुंद्रीक, प्रसाद राणे,विजय पाताडे,रश्मी आंगणे,अक्षया राणे, स्नेहा मोरे, वंदना राणे ,संतोष देसाई, मंगेश राणे,समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थांच्या चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धेचे उदघाटन माजी आम. विजय सावंत यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. यावेळी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, मुंबई येथील सदा परब,जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत,जिल्हा परिषद सभापती सावी लोके,भैरवी प्रतिष्ठानचे अतुल रावराणे, कोकण सिंचन मंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर,माजी आम. परशुराम उपरकर,कणकवली सभापती मनोज रावराणे,माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम, नगरसेवक संजय कामतेकर, जेष्ठ नेते,एस.टी सावंत,डॉ.विद्याधर तायशेट्ये ,नगरसेवक सुशांत नाईक,जेष्ठ नेते लवू वारंग,प्रसाद अंधारी,संदेश पटेल,एम.एम.सावंत,सुहास सावंत,एम.एस. संकपाळ,सूर्यकांत वारंग,आप्पा सावंत,नगरसेवक अबिद नाईक,अँड हर्षद गावडे,शैलेश भोगले,समीर प्रभूगावकर,आदी सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.या सर्वांचे सकल मराठा समाजाच्या वतीने या सर्वांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मुलांच्या विविध स्पर्धा झाल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!