*कोंकण Express*
*लेखक प्रमोद कोयंडे यांना सांडू प्रतिष्ठानचा पुरस्कार प्रदान*
*कासार्डे : प्रतिनिधी*
लेखक प्रमोद कोयंडे यांना ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते रविवारी द.कृ. सांडू प्रतिष्ठानचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.प्रमोद कोयंडे यांना त्यांच्या ” रस्सा उडाला भुर्रर्र ” या बालकथा संग्रहासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
चेंबूर,मुंबई येथील बालविकास संघ सभागृहात झालेल्या या सोहळ्यात विविध प्रकारच्या लेखनासाठी पुरस्कार देण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंद सांडू आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमोद कोयंडे आणि इतर पुरस्कारप्राप्त साहित्यिकांनी आपल्या पुस्तक लेखनाचा प्रवास उलगडला.कवी अशोक नायगावकर आणि नमिता कीर यांची समयोचित भाषणे झाली.याच कार्यक्रमात आनंद सांडू यांच्या तीन पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.